शेगाव – प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या प्रसिद्ध अशा घट मांडणीचे भाकीत आज वार गुरुवार रोजी दि.१ मे २०२५ रोजी पहाटे जाहीर करण्यात आली आहे. पिक पावसा संदर्भात भविष्यवाणीसाठी बुलढाणा येथील भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर इतरही गोष्टींवर भाकीत या भेंडवळच्या घट मांडणीतून केली जातात. यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस व अवकाळी पाऊस असेल.
- या वर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद मुंग, ज्वारी, तूर आदी पिकांचा समावेश आहे. तर शेतमालाला भाव मिळणार नाही, त्यामुळे मंदी सावट असेल. असा अंदाज भेंडवळच्या गट मांडणीमध्ये सारंगधर महाराज यांनी व्यक्त केला आहे.
आज १ मे २०२५ रोजी सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आलेत. भेंडवळची मांडणी ही ३५० वर्षांपासून ची स्थानिक परंपरा आहे. त्या परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजानंवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल, राजा कायम असेल पण कायम तणावात असेल, यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल, परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे.
भारत – पाकिस्तानात युद्ध होणार?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यामुळे येत्या काळात युद्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर देखील भेंडवळच्या भविष्यवाणीत भाष्य करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. मात्र, देशात तणावाचं वातावरण असेल. तसेच देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. तसेच परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही परंतु ३५० वर्षांची परंपरा आहे!
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.