नाशिक | Nashik
मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात पावसाची काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिपरिप सुरु आहे. तसेच शहरात सकाळी ऊन तर दुपारच्या सुमारस पाऊस हजेरी लावतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र आहे…
Ajit Pawar : “…म्हणून अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
शहरातील काही भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याचे चित्र होते. तर काही भागांत उन्हाचे चटके जाणवत होते. त्यानंतर बारा वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील एमजी रोड, शालीमार, सीबीएस यासह आदी परिसरात पावसाने तुफान हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
Bus Accident News : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पूलावरून कोसळली
दरम्यान, हवामान विभागाकडून (Meteorological Department) आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Dsitrict Rain) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील काही भागांत जोरदार हजेरी लावली.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
“2024च्या आधीच भाजपात…”; संजय राऊतांचा मोठा दावा