Saturday, April 26, 2025
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरला पावसाची मुसळधार हजेरी; शेतीच्या कामांना वेग

त्र्यंबकेश्वरला पावसाची मुसळधार हजेरी; शेतीच्या कामांना वेग

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुष्य नक्षत्राचा पाऊस (Rain) आहे. त्यामुळे डोंगर दर्यांतून नाले आणि धबधबे दुधडी भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शेतीच्या कामांना देखील वेग आला असून काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसाचा जोर अधिक वाढल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : हुल्लडबाजांवर कारवाई; चार ठिकाणी नाकाबंदी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) काही भागांत पाऊस कमी जास्त प्रमाणावर सुरु असल्याने काही भागांत भात लागवड कमी वेगाने तर काही भागांत जास्त वेगाने सुरु आहे. तसेच काही भागांत थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा प्रत्यय यावा अशा पद्धतीने पाऊस पडत आहे. मात्र,तालुक्यात शेती उपयुक्त पाऊस झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा : आमदार खोसकरांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘एकनाथ शिंदे…’

दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जरी कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी येथील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तसेच वातावरणात मोठा गारवा पसरला असून जनजीवन देखील मंदावले आहे. दुसरीकडे या पावसामुळे त्र्यंबक भागातील आणि परिसरातील नद्यानाले व धरण (Dam) भरण्यास मोठी मदत झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...