Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात जोरदार पावसाला सुरुवात

नाशकात जोरदार पावसाला सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र आज गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी नाशकात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे…

- Advertisement -

सकाळपासूनच वातारणात उष्णता जाणवत होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि अचानक धो धो पावसाला सुरुवात झाली.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले. पावसापासून बचावासाठी अनेकांनी रेनकोट आणि छत्र्यांचा आधार घेतला. काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या