Saturday, July 27, 2024
Homeनगरव्यापार्‍यांच्या मदतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची चढाओढ

व्यापार्‍यांच्या मदतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची चढाओढ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील व्यापार्‍यांची दुकाने कोविड नियमांचे उल्लंघन (Violation of shops covid 19 rules) केले म्हणून श्रीरामपूर (Shrirampur) येथील पोलीस व नगरपालिका प्रशासनाने सील (Sealed by police and municipal administration) केली. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे व अशांततेचे वातावरण निर्माण झाले. आ. कानडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) जाऊन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांची भेट घेतली व सील केलेली दुकाने साधक बाधक विचार करून खुली करण्याबाबत आग्रहाची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार (Collector Sub-Divisional Officer Anil Pawar) यांना फोन करून आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन तातडीने आजच कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.

- Advertisement -

शनिवार दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी सर्व व्यापारी शिष्टमंडळ आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांना त्यांच्या यशोधन कार्यालयात भेटले. त्याचवेळेस जिल्हाधिकार्‍यांशी आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांनी फोनवरून चर्चा केली व सरसकट कारवाई करण्याऐवजी व्यापार्‍यांना समज देऊन त्यांना एक संधी द्यावी, अशी विनंती केली. याबाबतचा निर्णय सोमवारी संध्याकाळी घेऊ, असे प्रशासनाने सांगितल्याने आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांनी व्यापार्‍यांना तसे आश्वासन दिले. परंतु सोमवार अखेरपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने काल ते जिल्हाधिकार्‍यांना (Collector) भेटले.

त्यानुसार अशोक कानडे (Ashok Kanade) यांच्यासह व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष विशाल पोफळे, राहुल मुथा, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, निलेश ओझा व इतर व्यापारी तसेच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे आदी प्रमुख पदाधिकारी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना भेटून सदर विषयाबाबत चर्चा केली श्री. पवार यांनी उद्यापासून दुकाने उघडण्यासंदर्भात आमदारांच्या तसेच जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार निर्णय घेत आहोत असे व्यापार्‍यांना सांगण्यात आले. त्यासंदर्भात मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत सुचित करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे (Congress Party) पदाधिकारी विलास थोरात, सतीश बोर्डे, राजद्र औताडे, जयेश खर्डे उपस्थित होते.

अखेर सील केलेली दुकाने उघडणार नगराध्यक्षा आदिकांची यशस्वी शिष्टाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील व्यापार्‍यांवर अन्याय होणार नाही यासाठी दक्षता घ्या. ज्यांची दुकाने सील करण्यात आली त्या व्यावसायिकांनी हमीपत्र द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना केल्या. त्यामुळे सील केलेली दुकाने उघडण्यात येणार आहेत. नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Mayor Anuradha Adik) यांनी व्यापार्‍यांसाठी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.

शहरातील व्यापार्‍यांची दुकाने प्रशासनाने सिल केली होती या संदर्भात नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन व्यापार्‍यांच्या व्यथा जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडल्या. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब डोळस, नगरसेविका वैशालीताई चव्हाण, नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, सोमनाथ महाले, समित मुथ्था, कलिमभाई कुरेशी, अल्तमश पटेल, रोहित शिंदे, सुभाष पोटे, राजेश चोपडा, वाल्मिक सरोदे, देवेंद्र पारख, गणेश गवारे, सचिन डंबिर, जमित सिंग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी सर्व बाबींबाबत सकारात्मक भूमिका घेतली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार (Prantadhikari and Tehsildar of Shrirampur) यांचेशी संपर्क करुन कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.

त्यानुसार नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक (Mayor Anuradha Adik) यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेतली. या भेटीत तहसीलदरांनी ज्यांची दुकाने सील करण्यात आली त्या व्यावसायिकांनी हमीपत्र द्यावे अशा सूचना केल्या. त्यानुसार व्यावसायिकांनी हमीपत्र जमा करावेत, तसेच प्रशासनाने जी नियमावली दिलेली आहे. त्याचे सर्वांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक (Mayor Anuradha Adik) यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या