Friday, May 3, 2024
Homeक्रीडाऑॅलिम्पिकच्या तयारीसाठी द्युती विकणार तिची महागडी कार!

ऑॅलिम्पिकच्या तयारीसाठी द्युती विकणार तिची महागडी कार!

हैदराबाद –

टोकियो ऑॅलिम्पिक पुढे ढकलल्यामुळे भारताची वेगवान धावपटू द्युती चंदला निधीची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी तिला तिची बीएमडब्ल्यू कार विकायची आहे. द्युतीने २०१५मध्ये ३० लाखांची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली होती.

- Advertisement -

टोकियो ऑॅलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी मिळालेली सर्व रक्कम द्युतीने खर्च केली आहे. राज्य सरकार आणि प्रायोजकांकडून द्युतीला हा निधी मिळाला होता. कोरोनामुळे ऑॅलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

माध्यमांशी बोलताना द्युती म्हणाली, ‘माझे प्रशिक्षण आतापर्यंत चांगले चालले आहे. मी भुवनेश्वर येथे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी टोकियो ऑॅलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी निधीची कोणतीही अडचण नव्हती, कारण ऑॅलिम्पिक जुलैमध्ये होणार होते. दरम्यान कोरोनाव्हायरसमुळे ऑॅलिम्पिक पुढे ढकलले आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेण्यासाठीचे सर्व पैसे खर्च झाले आहेत.‘

द्युती पुढे म्हणाली, ‘आता मला प्रशिक्षणासाठी निधी आवश्यक आहे, परंतु कोरोनामुळे मला प्रायोजक शोधण्यात अडचण येत आहे. म्हणूनच मी प्रशिक्षणासाठी माझी कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.‘

२४ वर्षीय द्युतीला यंदा अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. कोरोनाचा खेळावर प्रचंड परिणाम झाला असून प्रायोजक यावेळी साथ द्यायला तयार नाहीत, असेही ती म्हणाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या