Saturday, July 27, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१७

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१७

Painful menstruation (पाळीमध्ये पोटात दुखणे)

पाळीच्या दिवसात खूप पोट दुखतं? हे दुखणं नॉर्मल आहे का?

- Advertisement -

पाळीमध्ये पोटामध्ये दुखणं ही समस्या अनेकजणींची असते. सर्वसाधारण पणे याचा कुठल्याही स्त्रीरोगाशी संबंध नसतो.

पाळीमध्ये ओटीपोटात दुखणे हे जवळजवळ ६० टक्के स्त्रियांमध्ये दिसून येते. ५ ते १५ टक्के स्त्रियांच्या वेदना इतक्या तीव्र असतात कि त्यांना दैनंदिन काम करणे अशक्य होते. काही मुलींमध्ये पाळीतील वेदना नियमित असतात पण जसजसं वय वाढत जातं या वेदना कमी होतात आणि काहींच्या बाबतीत बाळंतपणानंतर पूर्णच बंद होतात.

जर पाळी वेदना नियमित आणि तीव्र स्वरूपाच्या असतील आणि दिवसेंदिवस त्या वाढत असतील तर स्त्रिरोगतज्ञांची मदत घेतली पाहिजे.

का होतात वेदना ते जाणून घ्या.

पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांचे मुख्य कारण स्त्रियांच्या शरीरात तयार होणारे प्रोस्टाग्लॅनडीन(prostaglandin) रसायन हे आहे.हे गर्भाशयाच्या स्नायूंमधील आकुंचन वाढवते. एखाद्या स्त्री च्या शरीरात जितके जास्त प्रोस्टाग्लॅनडीन तयार होते तितकेच गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन वाढते व तितकाच स्रीला जास्त त्रास सहन करावा लागतो.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१६

लक्षणं कोणती?

खालील लक्षणे ही सहसा पाळीच्या १ ते २ दिवस आधी सुरू होतात व साधारण पाळीच्या पुढच्या २-३ दिवसात कमी होतात.

या वेदना ओटीपोटात येणाऱ्या cramps च्या (चमक येणे) स्वरूपात असतात. हे दुखणं मांड्या आणि पाठीच्या खालच्या भागात पसरू शकते. ओटीपोटाच्या वेदना पोटाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला देखील असतात.

काही महिलांना पाळीच्या वेदनांसोबत खालील लक्षणे पण दिसतात:

1) मळमळ, उलटी होणे

2) डोकेदुखी,

3) चक्कर येणे,

4) थकवा येणे

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५

पाळी वेदनेचे प्रकार कोणते?

प्राथमिक वेदना(Primary Dysmenorrhoea ) :

या प्रकारच्या वेदनेचा कुठल्याही स्त्री रोगाशी किंवा गर्भाशयाच्या आजाराशी संबंध नसतो. अनुवांशिकता,ताणतणाव, जास्त रक्तस्राव असणारी मासिक पाळी, धूम्रपान , व्यायामाचा अभाव ही कारणे असू शकतात. या प्रकारच्या वेदना किशोरवयीन मुलींना पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या 3 वर्षातच सुरू होतात.

दुय्यम वेदना(Secondary Dysmenorrhoea)

या प्रकारच्या वेदनांचे विशिष्ट मूळ कारण असते जसं कि एन्डोमेट्रिओसीस(Endometriosis),गर्भाशयावर येणाऱ्या गाठी, ऍडिनोमायोसिस (Adenomyosis),

पेलविक इंफ्लामॅटोरी डिसीज (pelvic inflammatory disease). या प्रकारच्या वेदना पाळीच्या 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहतात.प्रौढ स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसतो.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१४

उपचार काय?

जर पाळी वेदना नियमित आणि तीव्र स्वरूपाच्या असतील आणि त्यामुळे दैनंदिन कामकाज करणं अशक्य होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना शामक औषधे घ्यायला हरकत नाही.ही औषधे साधारणतः १ किंवा २ दिवसच घ्यावी लागतात आणि ती प्रोस्टाग्लॅनडीन तयार होण्याची क्रिया रोखतात. तीव्र पाळी वेदनेमध्ये कधीकधी गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश करावा लागतो.

जर पाळी वेदना सौम्य स्वरूपाच्या असतील तर :

1) गरम पाण्याच्या पिशवीने पाठ, ओटीपोट शेकवणे

2) पाठ, ओटीपोटाला हलका मसाज करणे

3) गरम पाण्याने अंघोळ करणे

4) विश्रांती आणि झोप घेणे

5) मद्यपान, धूम्रपान न करणे

6) नियमित व्यायाम करणे(एरोबिक्स, योगासने)

7) पोषक आहार घेणे

पाळी मधील वेदना अनेक मुलींना होतात. शरीरात बदल होतात तसेच या काळात भावनांमध्येही बदल होतात.कमी  स्वरूपाच्या वेदना असतील तर त्याचा काहिही धोका स्त्रीला होत नाही.पण जर वेदना तीव्र स्वरूपाच्या असतील तर मात्र त्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर आणि कामकाजावर होऊ शकतो.अशावेळी स्त्रीरोग तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे जेणेकरून त्रास वाढणार नाही.

डॉ.गायत्री धनंजय सांगळे,

स्रीरोग व प्रसूती शास्त्रज्ञ,

नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या