Saturday, July 27, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१८

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१८

पांढरा स्राव (White Discharge)

डॉक्टर ‘ही माझी चौदा वर्षाची मुलगी .. पांढरं जातंय म्हणते सारखं..घाबरलेच मी .. लगेच घेऊन आले तुमच्याकडे”

- Advertisement -

पाळी सुरू झाल्यापासुन ते पाळी बंद होऊन रजोनिवत्ती(मेनोपॉज) पर्यंत प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या योनीमार्गातून स्राव बाहेर पडत असतो. सामान्यत: हा स्त्राव पांढऱ्या रंगाचा, बुळबुळीत आणि चिकट असतो.

अंगावर पांढरे जाणे किंवा ल्युकोरिया (Leucorrhoea) हे नक्की काय आहे आणि वयानुसार कसे बदलत जाते हे आपण आता बघुया.

सर्वप्रथम हे लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे की आपल्या तोंडाच्या आतल्या भागाप्रमाणेच योनीमार्ग चा आतला भाग ही हा ओलसर असणे आणि राहणे अपेक्षित आहे,किंबहुना हा भाग पुरेसा ओलसर नसेल तर वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण देतो. नसैर्गिक रित्या त्यासाठीच योनीमार्गातल्या ग्रंथी हा पांढरा स्त्राव निर्माण करत असतात. या

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१७

स्त्रावामुळे योनीमार्गाची प्रतिकारशक्ती चांगली राहते व वेगवेगळ्या जंतसंसर्गापासून योनीमार्गाचे संरक्षण होत असते. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जननसंस्था परिपक्व होऊ लागते तसतसा योनीमार्गात पांढरा स्त्राव थोडा वाढू लागतो. पाळी सुरु होण्याच्या वेळेपर्यंत हे बदल चालू राहतात. पाळी सरू झाल्यावर हा पांढरा स्त्राव बहुतांशी हॉर्मोन्सच्या चक्राप्रमाणे बदलत असतो. दरवेळी पाळी सरू होण्याआधी, नंतर आणि दोन पाळ्यांच्या मध्ये जेव्हा स्त्रीबीज तयार होते तेव्हा हा स्त्राव थोडा जास्त प्रमाणात असतो.

आता स्त्रियांना प्रश्न असा पडतो की मग हा स्त्राव नॉर्मल आहे की नाही हे कसे ओळखायचे? तर या स्त्रावामुळे खाज, जळजळ अथवा वाईट वास असे त्रास होत असतील तर हे पांढरे जाणे बरोबर नाही आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला लगेच घ्यावा हे उत्तम !

व्हाइट डिस्चार्ज ची कारणाने :

नैसर्गिक ल्युकोरिया (Physiological leucorrhoea)

मासिक पाळी नंतर जाड श्लेष्मासारखा स्त्राव होतो. ते ढगाळ, पांढरे किंवा पिवळे असू शकते. खरं तर, हे सुचित करते की ओव्हुलेशन जवळ आल्याने इस्ट्रोजेनची पातळी वाढली आहे.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१६

पॅथॉलॉजीकल फंगल इन्फेक्शन बुरशीजन्य संसर्गामुळे योनीतून स्त्राव वाढतो आणि तो खूप जाड असतो दह्या सारखा.

वास्तविक, हेCandida बुरशीच्या वाढीमुळे होत. हे कोणत्याही वयोगटातील महिलांना होऊ शकते.

तीव्र खाज सुटेल तर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध घ्या.

वजायनायितीस

वजायनायतीस ही योनीमार्गाची जळजळ आहे, जी संसर्ग किंवा जळजळीमुळे होऊ शकते, योनीतून घट्ट स्त्राव येऊ शकतो जो पांढरा, राखाडी, पिवळा किंवा हिरवा अश्या रंगाचा असू शकतो.. याशिवाय, योनीतून दुर्गंधी येऊ शकते आणि जननेंद्रियाच्या भागात खाज सुटणे किंवा जळजळ जाणवू शकते. अनेक स्त्रियांना लघवी करताना वेदना किंवा अस्वस्थता येऊ शकते.

नाजूक भागांची व्यवस्थित स्वच्छता न करणे.

रक्ताची कमतरता

चांगल्या बॅक्टेरीयाची कमतरता, शरीरातील पीएच लेव्हलमध्ये बिघाड

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणे.

साबण आणि परफ्युमचा वापर करणे.

पोषक तत्वांची कमतरता.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५

सामान्यः निरोगी ल्युकोरीयासाठी कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. ही समस्या नसून शरीराच्या क्रियांचा एक भाग आहे ही समज जर महिलेला असेल तर बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा प्रश्न आपोआपच मिटतो. अंतर्वस्त्र सुती व सैल असावीत, लघवी आणि शौच करुन झाल्यावर शरीराचा खासगी भाग पुढून मागे या दिशेने नीट धुवून स्वच्छ करावा, योनितून डुशिंग करणे, किंवा औषधी किंवा सुगंधी टब बाथचा वापर करणे टाळावे यासारख्या साध्या उपायांमुळे फरक पडू शकतो.

आहारामध्ये बदल घडवून आणणे देखील फायदेशीर ठरु शकते. मसालेदार, तळलेले अन्नपदार्थ टाळणे, जास्त प्रमाणात कृत्रीम शर्करायुक्त मिठाई इत्यादी टाळणे आणि नैसर्गिक दही, फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, प्रो- बायोटिक यांचा नेहमीच्या आहारात समावेश केल्याने योनिमध्ये निरोगी जिवाणूंच्या वाढीस मदत मिळते आणि पुन्हा-पुन्हा संसर्ग होणे टाळले जाऊ शकते.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१४

साऱांश असा की, ल्युकोरिया ही काही जीवघेणी समस्या नाही, पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचे नेमके कारण काय याचे निदान करण्यासाठी आणि आवश्यकता असल्यास, त्वरीत उपचार सुरु करण्यासाठी स्रीरोगतज्ञांसी सल्लामसलत करुन समस्या लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. स्वतः ठरवलेले, मित्र, कुटुंबीय आणि केमिस्ट यांनी सांगितलेले उपचार अनावश्यक किंवा चुकीचे असू शकतात आणि त्यामुळे एखादी साधीशी बाब देखील खूप गंभीर आजार बनू शकते.

डॉ. अमृता अहिरराव पाटील

स्रीरोग तज्ञ

नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या