किशोरावस्था आणि Behavioural Therapy.
प्रत्येक कळीचे सुंदर फुल होते का??
काही कळ्या गळून पडता तर काही खुडल्या जाता! प्रत्येक कळीला उमलण्या साठी अनुकुल वातावरण मिळेलच असे नाही!
तसेच, सर्व किशोरवयीन मुलांना वाढीस अनुकुल परिस्थिती मिळेल असे नाही!
मुलामुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या कालावधीला पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १०–१८ वर्षांदरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलामुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोणातून या अवस्थेला विशेष महत्त्व दिले जाते.
त्याची दोन प्रमुख कारणे आहेत:
(१) पौगंडावस्थेच्या या काळात मुलामुलींमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात,
(२) या समस्यांकडे योग्य रीतीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न न झाल्यास मानसिक आणि पर्यायाने शारीरिक रोगांचे प्रमाण वाढू शकते.
या काळात वेगाने होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था अस्थिर होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन, समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू शकते. काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद, चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणेही दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा, हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता, न्यूनगंड, लैंगिक व्याधी, अस्थिरता इ. परिणाम दिसून येतात.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५
मुलांच्या तणाव-संबंधित वर्तणुकीच्या समस्या, भूक न लागणे(एनोरेक्सिया डिसऑर्डर) चिंता,निद्रानाश आणि लठ्ठपणा अशा अनेक समस्यांना सध्या मुलांना आणि पालकांना सामोरे जावे लागत आहे.
पौगंडावस्थेतील नैराश्य एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये दीर्घकाळापर्यंत दुःख किंवा चिडचिडपणा दिसून येतो, ज्यामध्ये थकवा, औदासीन्य, झोपेची समस्या, भूक न लागणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, निर्णय न घेता येणे किंवा मृत्यू किंवा आत्महत्येचे वारंवार विचार येणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१४
पौगंडावस्थेतील नैराश्य हे प्रौढांच्या नैराश्यासारखेच असते,प्रौढांसोबत दिसणार्या उदास भावनांच्या ऐवजी चिडचिडेपणा किंवा वर्तणुकीतील अस्थिरता दिसून येते.जे मुले तणावाखाली आहेत, अपयशी किंवा सतत आजारी आहेत त्यांना नैराश्याचा धोका जास्त असतो.
वर्तणूक थेरपी (Behavioral Therapy) किंवा वर्तणूक मनोचिकित्सा ही क्लिनिकल सायकोथेरपीचा संदर्भ देणारी एक व्यापक संज्ञा आहे. ह्या उपचार पद्धतीचा मुलांमधील नैराश्य, अकारण वाटणारी भीती(फोबिया), obsessive compulsive disorder ह्या मनोविकारांना विशेष फायदा होतो.
“औषधां ऐवजी दैनंदिन जीवनातील अयोग्य वर्तनांमध्ये आणि विचारांमध्ये योग्य ते बदल करून आणि सकारात्मक मानसिक संतुलन साधून वर्तणुक संबंधील मनोविकारांवर (behaviour disorders) मात करण्यास मुलामुलींना मदत करणे म्हणजे Behavioural Therapy होय.” मुलांना आणि पालकांना दिलासा देणारी ही थेरपी ठरत आहे.
प्रतिकुल वर्तनाचे, विचारांचे आणि प्रतिक्रीयेचे रूपांतर अनुकुल वर्तन, विचार आणि प्रतिक्रीये मध्ये करण्याचा प्रयत्न करणे तसेच भीती वाटणाऱ्या गोष्टींना योग्य रीतीने कसे सामोरे जावे, यशअपयशाचा सामना करण्यास मुलांना सक्षम करणे ह्याचा प्रयत्न वर्तणूक थेरपी मध्ये केला जातो.
#hERHealth किशोरवयीन आरोग्य :भाग-१३
Behavioral therapy पालकही मुलांना योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात.
पौगंडावस्थेत मुलामुलींना पालकांचा सकारात्मक आधार,योग्य प्रकारचे शिक्षण घेण्यासंबंधी मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्यांवर समुपदेशन केले जाते. मुलामुलींवर न रागावता त्यांच्या चुका कौशल्याने दाखवून देणे, चर्चेसाठी त्यांना घरातील वातावरण मोकळे ठेवणे आणि उत्तम सामाजिक व नैतिक वागणुकीचा आदर्श पालकांनी स्वत:च्या वर्तनाने मुलामुलींना घालून देणे हे देखील ह्या उपचार पद्धतीचे भाग आहेत.
समुपदेशन(counselling), सकारात्मक विचार व सकारात्मक मानसिकता आचरणात आणने, वर्तनामध्ये योग्य ते बदल करण्यास मुलांना मदत करणे हे ह्या उपचार पद्धतीचे घटक आहेत.
प्रत्येक मुलाला ह्या उपचाराने मदत होण्यास लागणारा कालावधी जरी भिन्न आहे परंतु उपचारा पश्चात आलेला गुण व सकारात्मक मानसिकता हा एक सक्षम प्रौढ बनण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतो!
प्रत्येक कळीला उमलुन सुंदर फुल होण्यास मदत करू या!
डॉ. पुनम अतुल पाटील
स्रिरोग तज्ञ