Tuesday, April 29, 2025
HomeधुळेPhotos # इथे दगडांनी घेतलाय् आकार

Photos # इथे दगडांनी घेतलाय् आकार

शिरपूर तालुक्यातील बोराडी हे तसे दुर्गम भागातील गाव मात्र आज संपुर्ण तालुक्याला नव्हेतर जिल्ह्याला अभिमान वाटावा असा कायापालट या गावात झालेला दिसतो. घरात कर्त्या व्यक्तीकडे दुरदृष्टी असेल तर कुटुंब पुढे जाते.तसे एखाद्या गावाला सक्षम आणि व्हिजन असणारे नेतृत्व मिळाले तर गावाचा खर्‍या अर्थाने विकास होतो. याचा प्रत्यय सध्या बोराडी गावात प्रवेश करताच आपल्याला येतो. रस्ते, पाणी, वीज, गटारी या मुलभूत सुविधांचा पलिकडे सुसज्ज व परिपुर्ण आरोग्य सुविधा आणि त्या काळापासून बोराडीत रोवलेले शिक्षणाचे बीज आज वटवृक्षात रुपांतरीत झाल्याने दुर्गम भागातही उच्च शिक्षणाच्या असलेल्या सुविधा हे बोराडी गावाचे खर्‍या अर्थाने वैभवच म्हटले पाहिजे.

या ठिकाणचे हे चित्र बघून आपल्या मनात वेगवेगळे विचार निश्चित आले असावेत. कुणाला हे एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले चित्र भासेल तर कुणाला या वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराचे शिल्प बनविल्याचे जाणवेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा इतका सुंदर नजारा निश्चित एखाद्या सुशोभित बगीच्या मधील असावा, असेही अनेकांना वाटले असावे. मात्र जसे दिसते, जे वाटते बर्‍याचदा तसे नसते तर त्या पलिकडेही बरेच काही सुंदर असते. अर्थातच हा अतिशय सुंदर असा नजारा कुठल्या बगिच्यातील नव्हे तर, शिरपूर तालुक्यातील बोराडी सारख्या छोेट्याशा गावात तिथल्या रहिवाशांसाठी केलेल्या सुविधांपैकी एक भाग आहे.

बोराडी-वाघाडी रस्त्यावरील विद्युत मंडळाच्या कार्यालयाजवळ रस्त्यावर नागरिकांना पहाटे फिरण्यासाठी वाकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार करण्यात आले आहेत. याच सायकलींग ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दगडांवर त्यांच्या त्यांच्या आकारानुसार हि चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे जणू दगडांनीच आकार घेतल्याचे दिसते आहे. सुसज्ज ट्रॅक आणि दोन्ही बाजूला वृक्ष लागवडीसह वेगवेगळ्य प्राण्यांच्या आकाराचे शिल्प उभे राहिल्यामुळे सायकलींग करणार्‍या बालकांचा ओढा अधिक वाढतो आहे. बोराडी गावाचे उपसरपंच राहूल रंधे यांच्या संकल्पनेतून हे गाव खर्‍या अर्थाने आकार घेते आहे. अर्थात त्यांना त्यांचे बंधू आणि कुटुंबातील सदस्यांचीही तेव्हढीच मोलाची मिळते आहे.

- Advertisement -

बोराडी ग्राम परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान टप्पा-3 राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकसहभागातून विविध कामे केली जात आहे. या वाघाडी – बोराडी रस्त्यावरील विद्युत मंडळाच्या कार्यालयाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन कि.मी. अंतरापर्यंत वाकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक करण्यात आले आहे.

उपसरपंच राहुल रंधे यांनी महिला वर्गाने फक्त मूल व चूल यामध्ये अडकून न राहता आपल्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे. महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहीले तरच घरातील सुख-समृद्धी, विवाह चांगली राहतील. महिलांनी देखील पहाटे फिरावे व आपल्या आरोग्य सांभाळावे यासाठी वाकिंग ट्रॅक वर सौरऊर्जेचे दिवे लावून महिलांसाठी खास सोय करण्यात आलेली आहे. यामुळे महिला वर्ग व मुलींना पहाटे फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. महिलांना मुलींना पहाटे फिरण्यास कुठल्याही प्रकारचे भीती वाटणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

लहान मुलांनी अभ्यासाबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेऊन मैदानी खेळात भाग घेऊन आपल्या गावाचे नाव राज्य पातळीवर गाजवावे. मैदानी खेळात मुलांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून लहान मुलांसाठी व युवकांसाठी सायकल ट्रॅक, वाकिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. या मुलांना सायकलींचे छंद लावून रोज मोठ्या प्रमाणावर सायकल फिरविण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास देखील होण्यास मदत होणार आहे. मोठ्या मुलांसाठी व्यायाम शाळा देखील उपलब्ध करून त्यांना व्यायामाचे साहित्य उपलब्ध दिले आहे.

वाकिंग व सायकल ट्रॅक जवळ वृक्षारोपण करून विविध प्रकारचे फुलांचे व शोभेची वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी नदी नाल्यातील मोठमोठे दगड ठेवून त्यांना त्या दगडाच्या आकाराने चित्र रंगून एक सुंदर असा देखावा निर्माण केला आहे. यामुळे येणार्‍यांना या देखाव्याचे भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.

गावातील रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यच असते. मात्र रंधे परिवार या कर्तव्याला जागत बोराडी गावात पुरेशा सुविधा देण्यासोबतच रहिवाशांच्या आरोग्याची, बालकांच्या भवितव्याची काळजी घेत आहेत. निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि प्रगतीसाठी आवश्यक शिक्षण हे बोराडीकर अनुभवत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....