Thursday, June 20, 2024
Homeनाशिकअंकाई किल्ल्यावर हेरिटेज वॉक

अंकाई किल्ल्यावर हेरिटेज वॉक

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

अंकाई किल्लावर ( Ankai Fort ) हेरिटेज वॉकचे ( Heritage Walk )उदघाटन मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिह साळवे,तहसीलदार प्रमोदजी हिले,येवला नगरपालिका मुख्याधिकारी नागेंद्रजी मूतकेकर,येवला पोलीस निरीक्षक अनिलजी भवारी, सहायक निबंधक पाडवी व माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल,अंकाई सरपंच नागिना कासलीवाल यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने येवला येथील तहसील प्रशासन व माणुसकी फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक पौराणिक अंकाई किल्ल्यावर आज हेरिटेज वॉकचे आयोजन केले. अंकाई गावातून नियोजन बद्ध प्रभातफेरी काढण्यात आली. त्यात प्रथम अमृत महोत्सवाचे फलक, वाजत गाजत अहिल्यादेवी होळकर व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी हातात तिरंगा झेंडा घेऊन त्यामागे ढोलपथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

त्यापाठोपाठ भारम व जळगावहुन आलेले पोलिस अकॅडमीचे जवान झेंडे घेऊन सामील झाले. त्यानंतर ग्रामस्थ व महिला,प्रभातफेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे, विस्तार अधिकारी यादव, सहायक निबंधक पाडवी, आनंद शिंदे, सचिन दराडे आदींनी मनोगत मनोगत व्यक्त करत केले. याप्रसंगी नायब तहसीलदार चांदवड कर साहेब,पोलीस उपनिरीक्षक राजपूत साहेब,पोलीस उपनिरीक्षक भिसे साहेब,ग्रा.पं.सदस्य डॉ प्रीतम वैद्य, सागर सोनवणे हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या