Tuesday, May 21, 2024
Homeजळगावअमळनेर दंगल प्रकरणी पाच जणांना हायकोर्टाचा दिलासा!

अमळनेर दंगल प्रकरणी पाच जणांना हायकोर्टाचा दिलासा!

अमळनेर – amalner

येथील जिनगर गल्ली, पानखिडकी परिसरातील दंगल प्रकरणी पाच संशयित आरोपीना हायकोर्टाचा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. माजी नगरसेवक सचिन विभाकर उर्फ गोपी कासार, राकेश बारी, कुणाल भावसार, ईश्वर लांडगे, योगेश लांडगे यांना उच्चन्यायालयाने जामीन मंजूर केला असून साधारण गेली 2 महिने जेलमध्ये असलेल्या या संशयित आरोपीना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच त्यांचे नातेवाईक व समर्थक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

गेल्या 2 महिन्यापूर्वी जिनगर गल्ली ते सराफबाजार पानखिडकी भागात किरकोळ कारणावरून दगडफेक होऊन 2 गटात दंगल झाली होती यात पोलीस अधिकारी राकेश परदेशी यांच्यावर तलवार हल्ला होऊन अनेक पोलीस देखील जखमी झाले होते. यात इरफान बेलदार सह दोन्ही गटातील पन्नास पेक्षा अधिक आरोपी करण्यात आले असून काही जेल मध्ये तर काही अद्याप फरार आहेत. सदर आरोपींवर दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने गोपी कासार, राकेश बारी, कुणाल भावसार, व ईश्वर लांडगे,योगेश लांडगे यांना काल दिलासा दिला,त्या मुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या