Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानवीन लाल कांद्यास 3131 रूपये भाव

नवीन लाल कांद्यास 3131 रूपये भाव

उमराणे । वार्ताहर Umrane

खारीपाडा महात्मा फुलेनगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये (Shri Rameshwar Krishi Market) लाल कांदा (Red Onion) शुभारंभ करण्यात आला. नवीन लाल कांद्यास 3131 रुपये क्विंटल असा सर्वोच्च भाव (Market price) मिळाला.

- Advertisement -

दरेगाव येथील शेतकरी (Farmer) कौतिक राजाराम जाधव यांनी नवीन कांदा (Onion) लिलावासाठी आणला होता. प्रथम कांदा लिलावाचा मान मिळविल्यामुळे रामेश्वर कृषी मार्केटमार्फत त्यांचा सत्कार कांदा व्यापारी रघुनाथ जॅकसन यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कांदा पूजन करण्यात आले. माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, प्रवीणलाल बाफना, संतोष बाफना, चिंधु खैरे, बबनराव नेहारकर, आण्णासाहेब गांगुर्डे, नितीन काला, शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून नवीन कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. बाफना ट्रेडिंग कंपनी यांनी 3131 सर्वोच्च भाव देऊन खरेदी केला.

याप्रसंगी ज्येष्ठ कांदा व्यापारी (Onion trader) पुंडलीक देवरे, जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडूकाका देवरे (District Onion Traders Association President Khandukaka Deore), श्री रामेश्वर कृषी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल, सचिव दौलतराव शिंदे, दिनेश देवरे, हरिदास जाधव, दिनेश पारख, योगेश पगार, विलास आहिरे, सचिन देवरे व कांदा व भुसार व्यापारी मापारी हमाल शेतकरी उपस्थित होते. पंकज ओस्तवाल यांनी संयोजन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या