Saturday, May 25, 2024
Homeदेश विदेशउत्तर भारतात पावसाचा हाहाकार! नद्यांना पूर, अनेकांचा मृत्यू

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! नद्यांना पूर, अनेकांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

एकीकडे महाराष्ट्रात तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता अजूनही उर्वरित महाराष्ट्रात म्हणावा तेवढा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा टेन्शनमध्ये आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश, दिल्लीसह उत्तर भारतातील किमान नऊ राज्यांमध्ये पाऊस व महापुराचा कहर सुरूच असून जनजीवन पूर्ण विस्कळित झाले आहे. अनेक भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह देशभरात पावसामुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, गेल्या ७२ तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. येथे ३ दिवसांत १२ इंच पाऊस पडला, जो सामान्यपेक्षा १० पट जास्त आहे. इथे डोंगर कोसळत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान-मप्रसह २४ राज्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. त्याचवेळी, १२ जुलैपर्यंत हिमाचलमधील १२ पैकी १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उत्तर भारतातील अनेक नद्या ज्यामध्ये दिल्लीतील यमुना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमधील रस्ते आणि रहिवासी सोसायट्यांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. रविवारी या भागांमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. पुरस्थितीमुळं ३९ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यांपैकी १४ टीम पंजाबमध्ये, १२ टीम हिमाचल प्रदेशात तर ८ टीम उत्तराखंडआणि ५ टीम हरयाणात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सुमारे ७००० भाविक भगवतीनगर बेस कँपमध्ये अडकून पडले आहेत. तर ५००० हून अधिक भाविक चांदरकोट बेस इथं अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

“आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे…”; अभिनेत्री काजोलचं विधान चर्चेत
Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, १९८२ पासून, दिल्ली NCR मध्ये जुलैमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस येथे पाऊस पडेल, परंतु त्याची तीव्रता कमी असेल. पुढील २४ तासांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या