रोहतक । Rohtak
हरियाणातील रोहतक येथील काँग्रेस युवा नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे काल रात्री दिल्लीतून 2 जणांना ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. सचिन असे आरोपीचे नाव आहे. तो बहादूरगढजवळील गावचा रहिवासी आहे.
सुरुवातीच्या तपासात आरोपीने हत्येचा गुन्हा कबूल केलाय. त्याने हत्येच कारण सुद्धा सांगितलं. आरोपी बऱ्याच काळपासून हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच तपासातून समोर आलय. प्रारंभीच्या तपासात ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आलाय. आरोपीने कबूल केलं की, त्याने हिमानीला भरपूर पैसे दिले होते. मात्र, तरीही ती सतत जास्त पैशांची मागणी करत होती. आरोपीच नाव सचिन असून तो सुद्धा रोहतकचाच राहणारा आहे.
रोहतक पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर ३६ तासांनी आरोपीला अटक केली. आरोपीने हिमानीची हत्या तिच्याच घरात केली. हिमानी विजयनगर येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिच्यासोबत तिची आई आणि भाऊ राहत होते. गुन्हा घडला त्या दिवशी ते दोघे नजफगढला गेले होते. हिमानी घरी एकटीच होती. मीडिया रिपोर्ट्नुसार आरोपी सचिनने हिमानीची तिच्याच घरात हत्या केली. तिचा मृतदेह एक सूटकेसमध्ये भरला आणि तिच्या घरापासून लांब ८०० मीटर अंतरावर सांपला बस स्टँडच्या फ्लायओव्हरजवळ ती सूटकेस नेऊन ठेवली.
हिमानी नरवाल काँग्रेस पार्टीशी संबंधित होती. कायद्याचे शिक्षण ती घेत होती. हिमानी २०२४ हरियाणा विधानसभा निवडणुकीत सक्रीय होती. हिमानीच्या नातेवाईकांनुसार तिच्या लग्नासाठी स्थळाचा शोध सुरु होता. प्राथमिक तपासात हिमानीच प्रेम प्रकरण समोर आलय. मारेकरी तिचा प्रियकरच आहे. पोलीस आज या सगळ्या घटनेचा खुलासा करतील.
याआधी रविवारी हिमानीची आई सविता यांनी दावा केला होता की, हिमानी 28 फेब्रुवारीला कंठावाडीत भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्या कार्यक्रमाला येणार होती. यानंतर मुलगी बेपत्ता झाली आणि १ मार्च रोजी तिचा मृतदेह सांपलाजवळ एका सुटकेसमध्ये सापडला. या आरोपांनंतर हिमानी नरवालच्या आईची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन केले, मात्र कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी मृतदेह रोहतक पीजीआयच्या शवागारात ठेवला. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी कंठावाडीत माझा कोणताही कार्यक्रम नव्हता.