Saturday, July 27, 2024
Homeनगरकोपरगावात हिंदूत्ववादी संघटनांचा विराट जनआक्रोश मोर्चा

कोपरगावात हिंदूत्ववादी संघटनांचा विराट जनआक्रोश मोर्चा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील खडकी येथे अत्याचार झालेल्या मदरशांवर बुलडोझर चालला पाहिजे व शहरांसह तालुक्यातील जेवढे अनधिकृत मदरशे आहेत त्यांच्यावर येत्या 24 तासाच्या आत कारवाई झाली पाहिजे असा इशारा हिंदू जन आक्रोश मोर्चाचे मुख्य वक्ते सुरेश चव्हाणके यांनी कोपरगाव येथे सकल हिंदू समाजाच्या झालेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये दिला.

- Advertisement -

निळवंडे धरण मुदतीत पूर्ण न केल्याने उच्च न्यायालयाची सरकारला अवमान नोटीस

कोपरगाव शहरातील हिंदू मुलीवर मदरश्यात झालेल्या अत्याचार व धर्मांतराच्या घटनेच्या विरोधात शहर व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी गुरूवार 20 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत चव्हाणके बोलत होते. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. अग्रभागी भगवा ध्वज होता. त्यामागे एका वाहनात साधु-संत व भारत मातेची वेशभूषा केलेली तरुणी सहभागी झाली होती.

मोर्चा सावकर चौक, गांधी नगर रोड, श्री. गो. विद्यालय, राम मंदिर रोड मार्गे छत्रपती संभाजी महाराज पुतळा, धारणगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेस मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक, युवती उपस्थित होत्या.

साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांनाही शैक्षणिक शुल्क परतावा

युवतींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन

मोर्चेकर्‍याच्या मागण्यांचे निवेदन अकरा मुलींचे हस्ते उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीपकुमार भोसले व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना देण्यात आले.

सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच गायत्री पेरणेंचे सदस्यत्व रद्द

तालुक्यात कडकडीत बंद

जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने शहरासह तालुक्यात व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चास पाठिंबा दर्शविला. शहरात आलेल्या मोर्चेकर्‍यांसाठी पाणी व नाष्ट्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली होती. विविध सामाजिक, राजकीय संघटना व व्यापारी महासंघाने यासाठी पुढाकार घेतला.

मोर्चात पोलिसांचा चोख बंदोबस्त

जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, 35 पीएसआय व एपीआय, चारशे पोलीस कर्मचारी यांच्यासह शिघ्र कृतीदल, दंगल नियंत्रक पथक, एसआरपीएफच्या दोन तुकड्या तसेच आरसीपीच्या तीन तुकड्या तैनात होत्या. तसेच ड्रोन कॅमेराद्वारे मोर्चावर करडी नजर ठेवली जात होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या