Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रHingoli Accident News : ट्रकचा भीषण अपघात; १५० मेंढ्यांसह ५ जणांचा मृत्यू

Hingoli Accident News : ट्रकचा भीषण अपघात; १५० मेंढ्यांसह ५ जणांचा मृत्यू

हिंगोली | Hingoli

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून शंभर ते दीडशे मेंढ्यांचादेखील मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी नागरिकांसह पोलिसांनी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केले आहे. जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात सुरु आहेत.

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल, नाशिकचा निकाल किती?

- Advertisment -

ताज्या बातम्या