Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार संतोष बांगर यांची पुन्हा जीभ घसरली; विद्यार्थ्यांसमोर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

आमदार संतोष बांगर यांची पुन्हा जीभ घसरली; विद्यार्थ्यांसमोर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

हिंगोली | Hingoli

हिंगोलीतील कळमनुरी (Hingoli Kalamnuri) येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Shivsena MLA Santosh Bangar) यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन शिवीगाळ (Threatened Employees) करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलींना शाळेतून घरी जाण्यासाठी वेळेवर बस का मिळत नाहीत असा सवाल करत त्यांनी धमकी दिली असून याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

दुधाळा, डिग्रस, पिंपरी, बोराजा या गावातील विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नव्हती. तसेच एसटी कंडक्टर देखील विद्यार्थिनींशी उद्धट भाषेत बोलत असल्याने या विद्यार्थिनींना थेट आमदार संतोष बांगर यांचे कार्यालय गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी आमदार संतोष बांगर यांच्याजवळ त्यांची व्यथा मांडत एसटी कंडक्टरची देखील तक्रार केली. संतोष बांगर यांनी देखील या विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी तात्काळ आगारप्रमुखांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत सज्जड दम भरला.

त्याचबरोबर, “तुमच्या बापाची बस आहे का? काही चुकीचे घडले किंवा कामात सुधारणा झाली नाही तर पायाखाली तुडवेन, तुम्हाला माहितीये माझे काम कसे असते तर, मी जेवढा चांगला आहे तेवढाच खराब आहे, मला काही कमीजास्त वाटले तर त्याला लोळेस्तोर मारेल अशी धमकीसुद्धा दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनीही आगारात उपस्थित होत्या.

दरम्यान, आमदार संतोष बांगर हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे पाहायला मिळाले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून अशी शिवराळ भाषा निघणे कितपत योग्य आहे? असा सवाल आता मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. तर या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या