Saturday, June 14, 2025
Homeनाशिकहिरावाडीत टोळक्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमीचा मृत्यू

हिरावाडीत टोळक्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमीचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पंचवटीतील हिरावाडी (Hirawadi Panchvati) परिसरातील त्रिमूर्ती नगरात (Trimurti Nagar) मागील भांडणाची कुरापत काढून दाेघांवर सात जणांच्या टाेळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (दि२३) सायंकाळी घडली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना यातील एकाचा मृत्यू झाला आहे….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि २३) सायंकाळी हिरावाडीतील त्रिमूर्ती नगरात सचिन जाेशी या संशयितासह सात ते आठ जणांच्या टाेळक्याने बाळा मंडलिक आणि व्यंकटेश शर्मा उर्फ गप्पी यांना गाठून मागील भांडणाची कुरापत काढली.

त्यानंतर वाद वाढत असताना टाेळक्याने धारदार हत्यारे काढून दाेघांवर वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही पंचवटीतील स्वधर्म नामक खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, व्यंकटेश शर्मा याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात होते. उपचार सुरु असताना आज पहाटेच्या सुमारास शर्माचा रुग्णालयात मृत्यू झाला.

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु आहे. या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारी नष्ट करण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि...