Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे ऐतिहासिक पाऊल

नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे ऐतिहासिक पाऊल

सातपूर । प्रतिनिधी

- Advertisement -

भविष्य निर्वाह निधी नाशिकचे प्रयास योजने अंतर्गत ईपीएस 1995 सभासदांना सेवा निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डरचे वाटप व पेन्शन सुरु करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी नाशिक कार्यालयाचे हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

यासाठी भारत सरकारने कर्मचारी भविष्य निधी योजेने अंतर्गत ईपीएस 95 सभासदासाठी प्रयास ही योजना सुरु केली आहे. या योजेने अंतर्गत जो सभासद वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत होतो त्या सभासदास त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्याची पेन्शन चालू होते. व त्या दिवशी त्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर देण्यात येते.

या योजनेसाठी सभासदास ज्या महिन्यात निवृत होणार असेल, त्या महिन्याच्या सुरवातीला त्याचा क्लेम फॉर्म (100) कंपनीतर्फे भविष्य निधी कार्यालयात पाठवावा लागतो. त्यानंतर भविष्य त्याचा क्लेम फॉर्म (10ऊ) कंपनीतर्फे भविष्य निधी कार्यालयात पाठवावा लागतो. त्यानंतर भविष्य निधी कार्यालय त्याचा पेन्शन फॉर्म पास (सेटल) करून पेन्शन पेमेंट आदेश (झझज) त्यास निवृतीच्या दिवसापर्यंत मिळेल व त्याची पेन्शन निवृत्ती नंतरच्या दुसर्या दिवसापासून सुरु होईल.

नाशिक भविष्य निधी कार्यालयाने या योजनेचा शुभारंभ केला असून, या महिन्यात निवृत्त होणार्‍या काही सभासदांचे पेन्शन क्लेम पास केले असून, त्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डरचे वाटप क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम.एम.अशरफ यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यांची पेन्शन सुरु करण्यात आली आहे.

यावेळी त्यांनी निवृत्त होणार्‍या सर्व सभासदास आवाहन केले की त्यांनी निवृत्त होणार्‍या महिन्याच्या सुरुवातीला आपले फॉर्म कार्यालयाकडे पाठवावे. व या योजनेचा फायदा करून घ्यावा व कंपन्यांनी ही निवृत्त होणार्‍या सभासदांचे फॉर्म कार्यालयाकडे वेळेत पाठविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम.एम.अशरफ यांनी केले

- Advertisment -

ताज्या बातम्या