Friday, April 25, 2025
HomeनाशिकFIDE Women's World Rapid Chess Championship 2024 : भारताच्या कोनेरू हम्पीने रचला...

FIDE Women’s World Rapid Chess Championship 2024 : भारताच्या कोनेरू हम्पीने रचला इतिहास; जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत दुसर्‍यांदा विजेतेपद

न्यूयॉर्क । वृत्तसंस्था

भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने आज न्यूयॉर्कमध्ये इतिहास घडवला. जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करीत हम्पीने दुसर्‍यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून तीन दिवस आधीच नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला. कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा दणदणीत पराभव करून विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

- Advertisement -

37 वर्षीय हम्पीने 11 पैकी 8.5 गुणांसह ही स्पर्धा पूर्ण केली. याआधी 2019 मध्ये जॉर्जिया येथे हमपीने ही स्पर्धा जिंकली होती. दुसर्‍यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी हम्पी ही भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.
अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी जू वेनझुन, कॅटरिना लागनो, हरिका द्रोणावल्ली, अफरोजा खामदामोवा, टॅन झोग्यी आणि इरीन हे 6 खेळाडू हम्पीसोबत 7.5 गुणांसह हम्पीसोबत पहिल्या स्थानावर होते. या सर्व खेळाडूंचे सामने अनिर्णीत राहिले. हम्पीने अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून स्पर्धा जिंकली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

गेल्या वर्षी, 2023 च्या स्पर्धेत हम्पीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत जिगरबाज हम्पीने जबरदस्त कामगिरी करीत विजय मिळवून मागील पराभवावर मात केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...