छत्रपती संभाजीनगर | Sambhaji Nagar
राज्यात ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अशाच एका घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. मृणालिनी देसरकर (३८ ), आशालता पोपळघट (६५), अमोघ देसरकर (६ महिने), दुर्गा सागर गीते (७) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अजय देसरकर (४०), शुभांगिनी गीते (३५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे.
हे ही वाचा : जिल्हा सहकार बँकेचे पाय खोलात?
ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली. या प्रकरणी विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२) आणि कृष्णा कारभारी केरे (वय १९) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१३सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास विशाल आणि कृष्णा दारु पिऊन स्कॉर्पिओ चालवत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात पोहचताच स्कॉर्पिओने कारला जोराची धडक दिली.
धक्कादायक म्हणजे स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. स्कॉर्पिओची कारला धडक बसल्याचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी स्कॉर्पिओ चालक विशाल आणि कृष्णाला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष; बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारले