Friday, February 6, 2026
Homeमहाराष्ट्रHit and Run : पुन्हा हिट अँड रन! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव...

Hit and Run : पुन्हा हिट अँड रन! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव कारनं चिरडलं

मुंबई | Mumbai

राज्यभरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच मुंबईमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना आलिशान कारने जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे ४ वाजताच्या दरम्यान आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

अचानक कॅम्पस हॉटेलकडून भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने या दोघांना धडक दिली. धडक देऊन कारचालक पसार झाला आहे. या अपघातात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे.

घटनास्थळी नवघर पोलीस दाखल झाले असून कार चालकाचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई व उपनगरांत घडलेल्या हिट अँड रनच्या घटना चर्चेत असतानाच या नव्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :  संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...