Wednesday, May 27, 2026
HomeनगरSangamner : हिवरगाव पठार येथे विज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sangamner : हिवरगाव पठार येथे विज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर तालुक्यात अवकाळीचा तडाखा

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावअंतर्गत येणार्‍या दगडसोंडवाडी येथे बुधवार दिनांक 27 मे रोजी दुपारी सुमारे सव्वाचार वाजता वीज पडून एका 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र झुंबर दुधवडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत मच्छिंद्र दुधवडे हा तरूण खंडेरायवाडी येथे शेतीकाम करत होता. बुधवारी दुपारी तो आपल्या दगडसोंडवाडी गावी आला होता. याच दरम्यान परिसरात अचानक वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्याचवेळी जोरदार विजांचा कडकडाटही सुरू होता. त्यामुळे दुधवडे या तरूणाने दुचाकी गाळात गुतू नये म्हणून तो दुचाकी शेतातील रस्त्याने बाहेर काढत होता. मात्र त्याचवेळी वीज अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर परिसरातील शेतकर्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे दगडसोंडवाडीसह हिवरगाव पठार परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर रेंगाळला

0
पुणे | प्रतिनिधी Pune यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या सहा दिवस आधीच, म्हणजेच १६ मे रोजी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवास आता...