Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुणे-सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळले

पुणे-सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळले

पुणे । प्रतिनिधी

मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पाठोपाठ आज पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

सदर होर्डिंग बँड पथकाच्या वाहनावर कोसळल्याने वाहनाचे नुकसान होऊन बँड पथकातील घोडा जखमी झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

YouTube video player

ताज्या बातम्या