Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशRBI Monetory Policy: RBI चा सर्वसामान्यांना दिलासा! रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृह,...

RBI Monetory Policy: RBI चा सर्वसामान्यांना दिलासा! रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृह, वाहनावरील कर्जाचा हफ्ता कमी होणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
वाढत्या महागाईत आरबीआयने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता बजेट बिघडण्याची भीती नाही तर दोन पैसे खात्यावर राहू शकतात. आरबीआयने सर्वसामान्यांना दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता रेपो दर ५.५० टक्क्यांवर आला आहे. यापुर्वीही आरबीआयने सर्व सामान्यांना दिलासा देत रेपो दरात कपात केली होती. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची घोषणा केली.

RBI ने रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन ५० टक्क्यांनी कपात करून ५.५ टक्क्यांवर आणला आहे. ०.५० टक्के रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. SDF रेट ५.७५% वरुन कमी करुन ५.२५ टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. MSF दर ६.२५ टक्क्यांवरुन ५.७५ टक्क्यांवर आणले आहेत.

- Advertisement -

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, “सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पतधोरण समितीने (एमपीसी) (RBI MPC Meeting) आपला धोरणात्मक दृष्टिकोन ‘अ‍ॅकमोडेटिव्ह’ वरून ‘न्यूट्रल’ असा बदलला आहे. सध्याच्या परिस्थितीत विकासाला पाठिंबा देण्याची संधी मर्यादित आहे, त्यामुळे हा बदल आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. अन्नधान्याच्या महागाईबाबत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या किमती कमी होत असल्याने ती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

YouTube video player

या आधी रेपो रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. याआधी रेपो रेट ६ टक्के होता. आता ५० बेसिस पॉइंट्सने कपात केल्यानंतर रेपो रेट ५.५ टक्के झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करत आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बँकेचा हफ्ता कमी होणार
रिझर्व्ह बँकेने याआधी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.

रेपो रेट म्हणजे काय?
जेव्हा बँकांना पैशाची गरज भासते, तेव्हा त्या RBI कडून कर्ज घेतात. या कर्जावर बँकांना जो व्याजदर द्यावा लागतो, तो म्हणजे रेपो रेट. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यास बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. बँकांना कमी दराने कर्ज मिळाल्यास त्या ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्जपुरवठा करु शकतात. RBI रेपो रेटचा वापर अर्थव्यवस्थेतील तरलता आणि चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी करते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...