Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याIAS इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृहखात्याची जबाबदारी

IAS इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृहखात्याची जबाबदारी

मुंबई | Mumbai

बदलापूरमधील (Badalapur) अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर IAS इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची गृहखात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून इक्बालसिंह चहल हे कामकाज पाहत होते. आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहखात्यात अप्पर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते.

या आदेशानुसार इक्बालसिंह चहल (IAS Iqbal Singh Chahal) यांची बदली करण्यात आली होती. चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...