Sunday, September 8, 2024
Homeराजकीय"उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते"; अमित शाहांचा घणाघात

“उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते”; अमित शाहांचा घणाघात

पुणे | Pune

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर पुण्यातील बालेवाडीत भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या माध्यमातून भाजपने विधानसभेचे बिगुल फुंकले असून आज दुपारच्या सत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

हे देखील वाचा : शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार – अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. त्यामुळे औरंगजेब फॅन क्लब भारताची (India) सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही.उद्धव ठाकरे कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत आहेत. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही.केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो, असे शाह यांनी म्हटले.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी, देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय – बावनकुळे

पुढे बोलतांना शाह म्हणाले की, स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत.उद्धवजी याकूबला सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, असेही शाह यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मैदानात उतरा आणि ठोका, अट फक्त एकच…; फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना ‘फ्री हँड’

तसेच नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशाच्या सुरक्षेला सुनिश्चित केले आहे. देशात दशकांपासून असलेल्या नक्षलवादाच्या त्रासाला आता समाप्तीच्या मार्गावर आणला आहे. मी आज आपल्याला सांगून जातो की, पुढच्या दोन वर्षात हा देश नक्षलवाद्यांपासून मुक्त होणार असून यात कोणतीच शंका नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या