Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकअधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे - गृहमंत्री अमित शाह

अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

नाशिक | Nashik

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सर्व केंद्रीय सुरक्षा व कायदे विषयक सेवा देणार्‍या कार्यालयांच्या प्रमुख अधिकार्‍यांशी सुरक्षा आणि कायदेशीर सेवांबरोबरच ‘मल्टी एजन्सी सेंटर’ कार्यप्रणाली बाबत चर्चा केली. त्यात नाशिक विभागातील अधिकार्‍यांचाही समावेश होता. अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे, असे आवाहन शाह यांनी केले.

हे देखील वाचा : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनींचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

दिल्लीच्या इंटलीजन्स ब्युरोच्या (Intelligence bureau) मुख्यालयात ‘मल्टी एजन्सी सेंटर’ कार्यप्रणाली संदर्भात झालेल्या या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कार्यालयांचे खाते प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली ‘मल्टी एजन्सी सेंटर’ प्रभावशाली करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. यावेळी शाह यांनी देशांतर्गत सुरक्षेला आव्हान देणार्‍यांंच्या शहरी नक्षलवादी यांच्या निर्मुलनासाठी त्यांचे नेटवर्क आणि त्याना सहाय्य करणार्‍यानांच निप्पात करण्याबाबत सर्व एजन्सीत चांगला समन्वय ठेवण्यांचे आवाहन केले.

हे देखील वाचा : संपादकीय : २० जुलै २०२४ – वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल

तसेच शाह यांनी अंतिम जबाबदारी सह विविध, सहकाऱ्यांनी स्वत:हून कार्यरत राहुन योग्यवेळी योग्य कारवाईबाबत माहीती देण्यासाठी २४ तास काम करणे गरजेचे आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षेत सामिल झालेल्या सर्व एजन्सींनी युवक, तंत्रज्ञानात कुशल असलेले अधिकारीें यांची घट्ट मोट बांधावी जेणेकरुन देशांतर्गत आतंकवादाला संपविणे व त्यांना खतपाण़ी घालणाऱ्यांचा बिमोड करणे शक्य होईल, असेही अमित शाह म्हणाले.

हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

त्यासोबतच नव्या आणि उभरत्या सुरक्षा आव्हानांकडे पाहता आता प्रत्येक कार्यालयाने सदैव एक पाऊल पुढे राहणे आवश्यक आहे. देशांतर्गत सुरक्षेला आव्हान देणार्‍याना व आतंंकवाद्यांचे जाळे नष्ट करुन त्यांना मदत करणार्‍याना आळा घालण्यासाठी सर्व एजन्सीत चांगल्या समन्वयावर त्यांनी जोर दिला. अपला सहभाग वाढविण्यासाठी मंच बनवा तो त्वरित   ड्रग्ज विरोधी व सायबर सुरक्षा आणि इतर यंत्रणाना कारवाईसाठी एकाचवेळी मदत करु शकेल, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या