Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बालेवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या(रविवार दि. २१ जुलै) भाजपा नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत दुरावलेला संपर्क सेतु पुन्हा जोडण्यासाठी राज्यात काढल्या जाणाऱ्या संवाद यात्रेची तयारी आणि विधानसभेसाठी व्यूहरचना, याचे आराखडे या अधिवेशनात बांधले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या राज्यातीलपराभवाचे चिंतन आणि मनन करताना शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कानउघाडणी होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

या अधिवेशनासाठी पुणे नगरी सज्ज झाली आहे. दरम्यान, ‘आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा’ अशा आशयाचे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहे. अमित शहा राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करतील. विधानसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने रणनीती बदलल्याची चर्चा आहे. भाजप अधिक जागांवर दावा करण्याची आणि मित्र पक्षांना योग्य उमेदवार निवडीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

अमित शहांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या घडामोडींचा लोकसभेच्या निवडणुकीतफायदा न होता तोटाच झाल्याचे लक्षात आल्यावर भाजपकडून विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयारीला वेगआला आहे. त्यासाठी राज्यभर संवाद यात्रा काढली जाणार आहे. त्याची गावपातळीपासून राज्य पातळीवर कशीतयारी करायची, याबाबत अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.शहा हे कोणती भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या