Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHonesty : जास्त आलेली एक लाखाची रोकड बँकेत केली परत

Honesty : जास्त आलेली एक लाखाची रोकड बँकेत केली परत

बागुल यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

सटाणा | प्रतिनिधी Satana

- Advertisement -

सटाणा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशियरकडून नजरचुकीने एक लाख रुपये जास्तीचे दिले गेले असतानाही संबंधित रक्कम प्रामाणिकपणे बँकेकडे परत केल्याबद्दल बँकेचे खातेदार किशोर बागुल यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

बँकेत व्यवहार करताना झालेल्या मानवी चुकीमुळे किशोर बागुल यांना देण्यात आलेल्या रकमेपेक्षा एक लाख रुपये अधिक मिळाले होते. सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता तत्काळ बँकेशी संपर्क साधून सदरची रक्कम बँकेस परत केली.

बागुल यांच्या प्रामाणिक कृतीबद्दल बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन चेअरमन दिलीप येवला, संचालक कैलास येवला, जगदीश मुंडवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळातील सदस्य व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

आभार मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी मानले. बागुल यांच्या प्रामाणिक आणि जबाबदार कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...