Monday, May 27, 2024
Homeनाशिकदिव्यांग व अव्यंग जोडप्यांचा सत्कार

दिव्यांग व अव्यंग जोडप्यांचा सत्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त (World Deaf Day) दिव्यांग व अव्यंग जोडप्यांचा सत्कार तसेच दिव्यांग मुलांचे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात समाजकल्याण विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

यामध्ये दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेत समाविष्ट असलेल्या दहा जोडप्यांच्या सत्कार हा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय दि.१७.६.२०१४ अन्वये दिव्यांग अव्यंग विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान रु.५०,०००/ अनुज्ञेय असून त्या अंतर्गत रु.२५,०००/- पोस्टाचे बचत प्रमाणपत्र रु.४,५००/- संसार उपयोगी वस्तु खरेदीसाठी व रु.२०,०००/- रोख स्वरुपात (आरटीजीएस व्दारे) व रु.५००/ कार्यालयीन सत्कार समारंभासाठी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार सन २०२१-२२ मधील प्राप्त तरतूदीच्या मर्यादेत खालील जोडप्यांना अनुदान मंजूर करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

   त्याचबरोबर नॅशनल ट्रस्ट ऍक्ट १९९९ अंतर्गत दिव्यांग पाल्यांचे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र देण्याचे शासनाचे निर्देश आहेत यानुषंगाने ११ दिव्यांग पाल्यांच्या पालकांना पालकत्व प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी(ग्रामपंचायत) अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या