नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इंडीगो विमान कंपनीच्या वतीने देशातील प्रमुख अमृतसर, दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, चेन्नई यांसारख्या १३ शहरांना जाण्यासाठी तर आग्रा, चंदिगड, श्रीनगर, लखनौ, रायपूर, विजयवाडा, यांसारख्या १३ शहरांतून येण्यासाठी ’हॉपिंग फ्लाइट’ची सेवा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही हा कनेक्ट इंडिगो कंपनीने उपलब्ध करून दिला होता, मात्र, २९ ऑक्टोबरपासूनच्या नव्या वेळापत्रकानुसार यापैकी अनेक शहरांना कमी वेळेत हा प्रवास करणे शक्य होणार आहे.
दिल्ली, बंगळुरूसह अन्य शहरांसाठी सोयीच्या वेळा देण्यात आलेल्या आहेत.
नाशिक विमानतळावरून सुरू असलेल्या इंदूर, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांकरिता तसेच नॉर्थ गोव्याकरिता सुरू असलेल्या विमानसेवे व्यतिरिक्त इतर शहरांसाठी हॉपिंग प्लाईट सूरू करर्याचा निर्णय इंडीगो विमान कंपनीने घेतला आहे. काही शहरांना थेट तर काही शहरांसाठी हॉपिंग प्लाईट सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नव्या वेळापत्रकानुसार नाशिकहुन कोलकता, वाराणसी, कोची, अमृतसर, बंगळूरू, भोपाळ, चेन्नई कोइम्बतूर डेहराडून, दिल्ली जयपूर, जैसलमेरया शहरांना नियमित सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
हॉपिंग फ्लाईट सुविधा
नाशिक विमानतळावरुन विविध शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध करुन न देता हॉपिंग प्लाईट सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक विमान तलावरुन बंगळूरु (साडेचार तास), चेन्नई (साडेपाच तास) कोइम्बतूर (पाच तास), दिल्ली (सव्वा पाच तास), तर कोलकत्ता(सहा तास)या शहरांशी ‘कनेक्ट’ वाढणार आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
असे आहे होपिंग फ्लाइटचे वेळापत्रक
नाशिक-अमृतसर फ्लाईट गोवा मार्गे दुपारी 1 तर रात्री 11.30 वाजता असेल. नाशिक-बेंगळरू फ्लाइट हैदराबाद मार्गे सायंकाळी 7.25 रात्री असेल. नाशिक-भोपाल फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर रात्री 7.45 असेल. नाशिक-भुवनेश्वर फ्लाईट हैदराबादमार्गे सायंकाळी 7.25 रात्री 10.50 असेल. नाशिक-चेन्नई फ्लाईट गोवामार्गे दुपारी एक रात्री 5.50 तर नाशिक-दिल्ली फ्लाईट नागपूरमार्गे सकाळी 8.10 तर दुपारी 1.35 वाजता असेल. नाशिक-जयपूर फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर रात्री 8.25 ला असेल. तसेच नाशिक-कोलकता फ्लाईट हैदराबादमार्गे सायंकाळी 5.25 तर रात्री 11 वाजता असेल. तर नाशिक-वाराणसी फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर दुपारी 4.55 मिनिटांनी असेल.