
मनमाड | प्रतिनिधी Manmad
स्विफ्ट कार झाडावर आदळल्यानंतर खोल नाल्यात जाऊन पलटी झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी शहरापासून जवळ चांदवड मार्गांवर घडली. या अपघातात मनमाड शहरातील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे झाले आहे. खड्डा चुकविताना कार झाडावर आदळत थेट खोल नाल्यात जाऊन उलटली अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.
या बाबत अधिक वृत्त असे कि सागर बेदाडे, शफिक शेख हे दोघे मित्र एमएच-१९,सीयु-९०७२ या कारमधून नाशिकला कामानिमित्त गेले होते.काम आटोपून मनमाडकडे येत असताना शहरा पासून जवळ चांदवड मार्गांवर कार झाडावर जाऊन आदळल्या नंतर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात जाऊन उलटल्याने या अपघातात दोघांचा जागीच अंत झाला.
चांदवड-मनमाड मार्गावार अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचा नियंत्रण सुटलं आणि कार झाडावर आदळून नाल्यात जाऊन पलटी झाली. या खड्ड्यामुळे दोन तरुण मित्राचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. या अगोदर देखील खड्ड्यामुळे वारंवार अपघात झाले त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आणखी किती बळी घेतले जातील असा प्रश्न वाहन चालकांसह नागरीकांनी उपस्थित केला आहे शफिक हा उत्तम फिटर तर सागर व्यापारी होता दोघांची अनेक वर्षापासून मैत्री होती.दोघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे शहरावर शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे.




