Wednesday, March 26, 2025
Homeनगरमांजरीच्या घोडा-बैल जोडीने जिंकली पाचेगावची शेंबीगोंडा शर्यत

मांजरीच्या घोडा-बैल जोडीने जिंकली पाचेगावची शेंबीगोंडा शर्यत

प्रचंड प्रतिसाद || शर्यतीत 120 घोडा-बैल जोड्यांचा सहभाग

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ महाराज यात्रेची सांगता घोडा बैलांच्या थरारक शर्यतीने झाली. शेंबीगोंडा शर्यतीत पंचक्रोशीतील 120 घोडा-बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला. राहुरी तालुक्यातील मांजरी गावातील घोडा-बैल जोडीने पहिले बक्षीस घेत या शर्यतीचे मानकरी ठरले.

- Advertisement -

अक्षय तृतीयेनंतर येणार्‍या शुक्रवारी यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. यात श्री गहिनीनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारच्या मुख्य यात्रोत्सवाच्या दिवशी छबीना मिरवणूक झाली. रात्री 12 वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.शनिवारी 18 मे रोजी सायंकाळी 8.30 वाजता हिंदवी पाटील यांचा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. रविवार 19 मे दुपारी 5 ते साडेसात वाजेपर्यंत घोडा-बैल शर्यत शेंबीगोंडा कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली.

यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणार्‍याला रेंजर सायकल हे बक्षीस देण्यात आले तर दुसरा क्रमांकाला कुलर मशीन तर तिसरा क्रमांकांसाठी रोख रुपये अकराशे देण्यात आले. यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज आहेर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कुसळकर, आप्पासाहेब वैद्य, श्री. ढमाले यांनी बंदोबस्त ठेवला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...