Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमहॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड

हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड

महिलांसोबत गैरवर्तन || तिघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉस्पिटलमध्ये (Hospital) घुसून साहित्याची तोडफोड (Vandalized) करत ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर कुटुंबाला मारहाण (Beating) करून महिलांची छेड काढल्याची घटना रविवारी (9 जून) सायंकाळी सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) विनयभंग, मारहाण, नुकसान करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी उपनगरात राहणार्‍या डॉक्टरने (Doctor) याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

गणेश सर्जेराव फसले (रा. तपोवन रस्ता, सावेडी), घंट्या ऊर्फ गणेश घोरपडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे सावेडीत (Savedi) मनमाड रस्त्यावर हॉस्पिटल असून ते त्यांनी 25 जून 2020 रोजी गणेश फसले, कांचन अंकुश पालवे, गौतम स्वामी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यासोबत करार करून पाच वर्ष चालविण्यास दिले होते. दरम्यान यावरून यापूर्वी फिर्यादी व फसले यांच्यात वाद (Dispute) झाले होते. याबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.

YouTube video player

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी खासगी कामानिमित्त बाहेर असताना त्यांना मुलीने फोन करून सांगितले की, ‘आपल्या हॉस्पिटलमध्ये फसले काही लोकांना घेऊन आले आहेत व ते हॉस्पिटलमधील सामान बाहेर काढत आहे’ असे कळविले. फिर्यादी यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये (Hospital) धाव घेतले. फिर्यादी हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी त्यांची मुलगी व पत्नीने फसले व इतरांना हॉस्पिटलमध्ये येण्यापासून रोखले असता त्यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तशी माहिती मुलीने फिर्यादीला दिल्याने त्यांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) कळविले. तोफखाना पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी हॉस्पिटलचे साहित्य ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एम. बी. गरड करत आहेत.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...