Saturday, July 27, 2024
Homeनगरसंगमनेर तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात धर्मादाय असा उल्लेख होणार

संगमनेर तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात धर्मादाय असा उल्लेख होणार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत असणार्‍या तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात आता धर्मादाय असा उल्लेख होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना तसे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

जनतेच्या आरोग्याशी संबंधित 7 मुद्द्यांवर कार्यवाही करावी यासाठी श्री. बोर्‍हाडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानंतर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्वचं मुद्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे ठरले. ज्या खासगी रुग्णालयांनी करोना रुग्णांचे नियमानुसार बिले वसूल केली की नाही त्याबाबत बिलाचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत दिली जाणार आहे. ज्या लेखापरीक्षकांनी यात दुर्लक्ष केले त्यांच्यासह त्या रुग्णालयांवरही कारवाई केली जाणार आहे.

तालुक्यातील 8 धर्मादाय रुग्णालयांबाबत या बैठकीत चर्चा झाली ्होती. तालुक्यातील वामनराव इथापे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दर्शन रोटरी आय हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सौ.मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्टचे डेंटल हॉस्पिटल, अमृतवाहिनी रुरल हॉस्पिटल, अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल,सिद्धीकला हॉस्पिटल, वृंदावन (जनरल) या रुग्णालयांच्या नावात धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख करण्यासाठी सर्वांना पत्र दिले जाणार आहे. 8 पैकी ज्या धर्मादाय रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती.

त्या रुग्णालयांत उपचार घेतलेल्या 10 टक्के किंवा पूर्ण कोट्यातील सर्व रुग्णांच्या बिलाचे पुनर्लेखापरीक्षण केले जाणार आहे. तिथे उपचार घेतलेल्या दुर्बल व निर्धन रुग्णांना त्यांच्या बिलाची रक्कम परत देण्यात येईल आणि त्या सर्व संबंधित धर्मादाय रुग्णालयांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बैठकीत ठरले.

धर्मादाय रुग्णालयात उपचारसाठी दाखल होणार्‍या दुर्बल व निर्धन रुग्णांना नियमानुसार उपचार देणे बंधनकारक आहे. परंतु आपल्याकडे असे होत नाही पण भविष्यात त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी श्री. बोर्‍हाडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या