दिपक मुलमुले
पिंपळगाव हरे, ता.पाचोरा pachora
इच्छाशक्ती व दृढ आत्मविश्वास असला म्हणजे मनुष्य आपले ध्येय साध्य करु शकतो हे आजपर्यंत बऱ्याचशा ध्येयवेड्या लोकांनी सिध्द करून दाखविले आहे याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील कुमारी किरण बोरसे नुकतेच किरण बोरसे या मुलीने घरच्या प्रतिकुल परिस्थीतीवर मात करत मराठी सोनी मराठी टीव्हीवरील प्रतियोगिता कोण होईल करोडपती याच्यात भाग घेऊन शिंदाड गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे.
किरण बोरसे हिच्या घरची परिस्थिती बेताचीच वडील रंगकर्मी म्हणजे कलर पेंटिंग चे काम करत आपल्या संसाराचा गाडा ओढतात यांना एक मुलगा तो नुकताच नोकरीला लागला आहे तर मुलगी किरण घरची परिस्थिती बेताची असल्याने हिने इयत्ता पहिली ते सातवीचे शिक्षण नातेवाईकांकडे घेतले नंतर आठवी ते दहावीचे शिक्षण शिंदाड येथे मुळ गावी घेतल्यानंतर पुढील शिक्षण पिंपळगाव हरेश्वर येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन सद्यस्थितीत पाचोरा येथील सिनियर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर आता किरण बोरसे ही घरी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे किरण हिला भविष्यात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला अधिकारी होऊन समाजसेवा करायची असल्याचे तिने सांगितले अश्या या सर्वसामान्य कुटुंबातील किरण हिने मराठी प्रतियोगिता कोण बनेल करोडपती या मालिकेत भाग घेऊन शिंदाड गावाला नावलौकिक मिळवून दिला असल्याने तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.