Sunday, June 14, 2026
Homeक्राईमCrime News : हॉटेल रेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

Crime News : हॉटेल रेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

26 लाखाला ऑनलाइन गंडा || सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील व्यावसायिकाला ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 94 हजार 390 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने 6 मार्च 2026 रोजी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 6 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. हॉटेलला ऑनलाइन रेटिंग दिल्यास तुम्हाला 20 ते 30 टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने संशयित आरोपींना रक्कम दिली. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक नायर आणि मेघा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...