ठाणगाव | वार्ताहर Thangaon
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. बाऱ्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्याकडे झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. बाऱ्हे पोलीस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या वतीने या घटनेचा तपास सुरू करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
बाऱ्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना संशयित नाशिकमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत नाशिक येथील नांदुरनाका परिसरातील अरूण दाभाडे (५२, रा. कोळीवाडा) याला ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिकमधील भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, पिंपळगाव, कळवण, इगतपुरी, सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि किशोर जोशी, सपोनि संदेश पवार, बा-हे पो.स्टे.चे सपोनि सोपान राखोंडे, तसेच स्थागुशाचे सपोउनि शिवाजी ठोंबरे, नवनाथ सानप, पोहवा किशोर खराटे, सचिन देसले, संदिप नागपुरे, हेमंत किलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, हेमंत गरूड, मनोज सानप, योगिता काकड, ललिता शिरसाठ, तसेच अमोल गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, कुणाल वैष्णव, तृप्ती पवार, प्राजक्ता सोनवणे यांचे पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
हे देखील वाचा – संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ – जीवनगाणे गातच राहावे