Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये घर कोसळले 

नाशिकमध्ये घर कोसळले 

लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बुधवारी रात्रापासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने जुन्या बांधकामांची स्थिती धोकादायक बनली आहे. तर जुने नाशिक भागातील चव्हाटा येथील देवी मंदिराच्या पाठीमागे असलेले एक जुने घर आज सकाळच्या सुमारास कोसळले. तर शेजारच्या घराची भिंत पडली. दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

ही घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास झाली. सय्यद याचा वाडा घर नंबर 3515 यातील काही भाग कोसळला. यानंतर त्वरीत बाजुला असलेल्या विजय शिंदे यांच्या घराची भिंत देखील पडली. दरम्यान घराच्या वरच्या मजल्यावर दोन लहान मुले अडकले होते. त्यांना वाचविण्यात स्थानिक तरुणांनी मदतकार्य करुन सुखरूप बाहेर काढले. हा वाडा सय्यद आणि शिंदे यांच्या मालकीचा आहे. याठिकाणी या विजय शिंदे वास्तव्यास होते. तसेच आरीफ सय्यद यांचा परिवार दुसर्‍या ठिकाणी वास्तव्यास होता. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर धोकादायक घरे व वाड्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात झालेल्या सततच्या पावसामुळे या घराच्या भिंतींना तडे गेले होते. शेवटी आज ते संपूर्णपणे कोसळले. घटनास्थळी धुळीचा ढग उडाल्याने काही वेळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घराच्या शेजारी असलेल्या रहिवाशांनी वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच नाशिक महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

संपूर्ण परिसर बंदिस्त करून सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्थानिकांनी याआधीच महापालिकेला सदर घराची धोकादायक स्थिती कळवली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

ताज्या बातम्या

Nashik Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या हॉटेल कामत समोर रविवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने....