Sunday, May 26, 2024
Homeनाशिकगॅस गळतीमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

गॅस गळतीमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील मलढोण येथे घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

सदाशिव किसन गेठे यांच्या घरातील महिला स्वयंपाक करून गॅस बंद करीत असताना अचानक गॅस सिलेंडर जवळ भडका उडाला. गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या भीतीने कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी परिसरातील राहुल पावले या युवकाने धाडस करत पाण्याच्या प्रेशरने आग विझवली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी गेठे यांच्या घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे गेठे यांनी सांगितले. पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गेठे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या