अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील रतनवाडी (Ratanwadi) येथे सोमवारी (दि.3) मध्यरात्री घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. राहत्या घराची दगडी भिंत (House Stone Wall Collapsing) अचानक अंगावर कोसळून अवघ्या आठ महिन्यांच्या सृष्टी अशोक झडे या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Little Girl Death) झाला. तर तिची आई सोनाली ही गंभीर जखमी झाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झडे कुटुंब आपल्या घरात गाढ झोपलेले असताना घराच्या पश्चिम बाजूची जुनी भिंत अचानक कोसळली. दुर्घटनेमध्ये अंथरुणावर झोपलेल्या सृष्टीच्या अंगावर मोठे दगड (Stone) आणि मातीचा ढिगार पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली, तिची आई सोनाली हिला सुद्धा या दुर्घटनेमध्ये गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करून मायलेकीला बाहेर काढलं आणि उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राजूर (Rajur) येथे दाखल केले. त्यानंतर सृष्टी हिला मृत घोषित केले. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यामध्ये (Rajur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परसराम तागड, पोकॉ. श्रीकांत नरोडे, संभाजी सांगळे आणि विनायक कोकणे करत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल, उपचाराची व्यवस्था होईल. मात्र निष्पाप चिमुकलीचा गेलेला जीव कोण परत आणणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेनंतर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दवाखान्यात जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.




