Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, भारत सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काल तीन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केल्यानंतर आता आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत.

- Advertisement -

एकूण पाच दहशतावाद्यांची घरे (House) पाडून लष्कराने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. हे दहशतवादी २०२३ पासून लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत. लष्कराने जून २०२३ पासून लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे दोन मजली घर आयईडी स्फोटके लावून पाडले. तो पुलवामातील मुर्रान येथील रहिवासी आहे. अशीच कारवाई सुरक्षा दलाने २ वर्षांपूर्वी लश्कर ए तोयबामध्ये दाखल झालेल्या आणखी एका दहशतवाद्याविरोधात केली.

YouTube video player

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील (Kulgam) झाकीर अहमद गनी आणि शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टय यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. याआधी लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील आदिल हुसैन ठोकेर (उर्फ आदिल गुरी), अवंतीपुरा येथील आसिफ शेख आणि पुलवामामधील एहसान शेख यांच्या घराचे पाडकाम केले होते. ठोकेरने २०१८ साली अटारी-वाघा सीमेतून पाकिस्तानमध्ये कायदेशीर प्रवेश मिळविला होता. मागच्या वर्षी तो लपून-छपून जम्मू-काश्मीरमध्ये परतला. पाकिस्तानमध्ये त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे.

आदिल थोकरने रचला होता बैसरनमधील हल्ल्याचा कट?

आदिल थोकर ऊर्फ आदिल गुरी असे नाव असलेल्या दहशतवाद्यानेच बैसरनमध्ये पर्यटकांची हत्या करण्याचा कट रचला आणि तो हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

घरे पाडण्यात आलेले पाच दहशतवादी 

आदिल थोकर (बिजबेहरा)
आसिफ शेख (ट्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहीद अहमद (शोपिया)
जाकीर गनी (कुलगाम)

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...