Wednesday, October 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजम्हाडाच्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती

म्हाडाच्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे ( Minister Atul Save) यांनी दिली आहे. मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेला १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले

आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ आणि पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरण (Unveiling of the Icon) अतुल सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

हे देखील वाचा : नाशिक जोडले जाणार संपूर्ण भारताशी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा होणार सुरू; खा. वाजेंच्या पाठपुराव्याला यश


ते म्हणाले की, नवीन आणि  मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : भ्रष्टाचार कुठे करायचा याचं तारतम्य सरकारला राहिलेले नाही; शरद पवारांची महायुतीवर टीका

दरम्यान, यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती आणि  पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि नियोजनकार पी. डी. साळुंखे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या