Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशSN Subrahmanyan : घरी बायकोकडे किती वेळ पाहणार? ९० तास काम करा;...

SN Subrahmanyan : घरी बायकोकडे किती वेळ पाहणार? ९० तास काम करा; L&T चे सर्वेसर्वा सुब्रमण्यम यांचं वक्तव्य

मुंबई । Mumbai

बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘लार्सन अँड टुब्रो’ (Larsen & Toubro) म्हणजेच ‘एल अँण्ड टी’चे (L&T) अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन (SN Subrahmanyan) सध्या देशभरामध्ये चर्चेत आहेत. एसएन सुब्रमण्यन चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासंदर्भात व्यक्त केलेलं मत.

- Advertisement -

एस एन सुब्रमण्यन यांना एका कार्यक्रमादरम्यान ‘लार्सन अँड टुब्रो’ची अब्जावधींची उलाढाल असूनही इथल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर यावं लागतं, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. तसेच रविवारी घरी बसून किती वेळ बायकोला पाहत राहणार त्याऐवजी कर्मचाऱ्यांनीह रविवारीही काम केलं पाहिजे असंही मत नोंदवलं. मला खंत आहे की मी लोकांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकत नाही. मी त्यांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकतो तर मला नक्कीच आनंद होईल. असं आश्चर्यकारक उत्तर एसएन सुब्रमण्यन यांनी दिलं.

तसेच यावेळी त्यांनी एका चिनी माणसाशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. त्या माणसाने चीनच्या अमेरिकेला मागे टाकण्याच्या क्षमतेचे श्रेय त्यांच्या कामगारांना दिले, जे अमेरिकन कामगार साधारणपणे ५० तास काम करतात तर आठवड्यातून ९० तास काम करतात. जर तुम्हाला जगाच्या एक पाऊल पुढे जायचे असेल तर तुम्हाला आठवड्यातून ९० तास काम करावे लागेल, असं त्यांनी सांगितले.

एस एन सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू झाला. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका या वक्तव्याचा निषेध केला. असे निर्णय घेताना सनडे चं नाव बदलून सनड्युटी केलं पाहिजे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टा स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या विधानाचा निषेध केलेलं दिसलं. ‘एवढ्या उच्च पदावर बसलेली एक वरिष्ठ व्यक्ती असं विधान कसं करून शकते, हे वाचून धक्का बसला, कारण मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे.’

दरम्यान लार्सन अँड टुब्रो कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘एल अँड टी’ मध्ये राष्ट्र निर्माण हा आमच्या उद्देशाचा गाभा आहे. आठ दशकांहून अधिक काळ, आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. पुढील १० वर्षे भारताची आहेत, ज्यामध्ये देशाचा विकास करण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे आमचा विश्वास आहे. आमच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानातून ही महत्त्वाकांक्षा दिसून येते. त्यांच्या वक्तव्याची दिशा ‘असाधारण परिणाम साध्य करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे’ असे निर्देशित करते.

कोण आहेत एसएन सुब्रमण्यन?

१६ मार्च १९६० रोजी तामिळनाडूतील चेन्नई येथे जन्मलेल्या सुब्रमण्यन यांनी कुरुक्षेत्र येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स (एमबीए) केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुब्रमण्यन १९८४ मध्ये एल अँड टी मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले. नंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम देखील पूर्ण केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...