Friday, April 25, 2025
Homeभविष्यवेधमनी प्लांटची काळजी कशी घ्यावी ?

मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी ?

मनी प्लांटला वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्रॉइंग रुम, बेडरुम आणि बाल्कनीत लावू शकता. ज्या घरात मनी प्लांट असतं तेथे लक्ष्मीची कृपा असते. पण मनी प्लांट लावताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. मनी प्लांट लावताना काही चुका केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो. जाणून घ्या मनी प्लांट लावण्याचे नियम…

या दिशेला लावा मनी प्लांट-
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीच घराच्या उत्तर पूर्व दिशेला लावू नये. यामुळे आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. या चुकीमुळे खर्चात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोतात अडचण येऊ शकते. मनी प्लांट कायम दक्षिण पूर्व दिशेला लावलं पाहीजे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. मनी प्लांट प्रसाधन गृहाजवळ लावू नये.

वरच्या दिशेने वाढतं असावं- मनी प्लांट लावल्यानंतर त्याची वाढ कोणत्या दिशेने होते हे देखील महत्त्वाचं आहे. मनी प्लांट लावल्यानंतर ते कधीही जमिनीला टेकणार नाही याची काळजी घ्या. कारण वेल सरळ वाढत असेल तर प्रगती होत असल्याचं मानलं जातं.

मनी प्लांट टवटवीत राहिलं पाहीजे-
मनी प्लांट लावल्यानंतर सुकू नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मनी प्लांट सुकल्यास आर्थिक अडचणीचे संकेत असतात. यामुळे व्यक्ती कायम कर्जाच्या ओझाखाली वावरतो.

मनी प्लांट घेऊ नये- वास्तुशास्त्रानुसार कधी कोणाकडूनही मनी प्लांट मागू नये. मनी प्लांटची देवाण-घेवाण अशुभ मानली जाते. यामुळे शुक्र ग्रह प्रभावित होतो. तसेच आर्थिक अडचण वाढू शकते

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...