पुणे | Pune
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल (Result) कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. अशातच आता बारावीच्या निकालाची (HSC Result) तारीख समोर आली आहे.
उद्या म्हणजेच सोमवारी (दि.५) रोजी दुपारी ०१ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल (Online Result) जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकणार आहेत.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांनी असा चेक करावा निकाल
- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका.
- त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.