Tuesday, May 6, 2025
HomeनगरHSC Result : यंदाही मुलीच हुशार ! नगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के

HSC Result : यंदाही मुलीच हुशार ! नगर जिल्ह्याचा निकाल 86.34 टक्के

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याचा निकाल तब्बल 7 टक्क्यांनी घसरला. यंदाचा निकाल 86.34 टक्के लागला आहे. त्यात मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. बारावीच्या परीक्षेत मुलींच्या निकालाची टक्केवारी 92.51 टक्के तर मुलांची टक्केवारी 86.34 टक्के आहे.

- Advertisement -

राज्य परीक्षा मंडळातर्फे बारावीचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी बारावीची परीक्षा 32 हजार 866 मुले व 27 हजार 65 मुली अशा एकूण 60 हजार 931 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून 27 हजार 39 मुले (81.41 टक्के) व 25 हजार 39 मुली (92.51 टक्के) असे एकूण 52 हजार 609 विद्यार्थी (86.34 टक्के) उत्तीर्ण झाले. मागील वर्षीप्रमाणे यंदा पुणे विभागात नगर जिल्हा तिसर्‍यास्थानी फेकला गेला. पहिल्या स्थानावर पुणे त्याखालोखाल दुसर्‍या स्थानावर सोलापूर असून नगरचा नंबर तळाला आहे.

जिल्ह्यात जामखेड तालुक्याचा निकाल सर्वाधिक 94.89 टक्के लागला. त्यानंतर संगमनेर (93.70 टक्के) व राहाता (89.82 टक्के) तालुक्यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी निकाल शेवगाव (76.63 टक्के) तालुक्याचा लागला. बारावीच्या परीक्षेला 33 हजार 866 मुले बसली होती. त्यापैकी 27 हजार 570 पास झाली असून निकाल 81.41 आहे. तर 27 हजार 65 मुली बसल्या होत्यापैकी 25 हजार 39 मुलीपास झाल्या असून 92.51 टक्के निकाला आहे.

जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षेदरम्यान यंदा शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यात राबवले. तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी अशोक कडूस व इतर शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी यात महत्वपूर्ण योगदान दिले. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने, तसेच केंद्रनिहाय पथके नेमल्याने कॉपीस आळा बसला. त्यामुळे निकाल कमी दिसत असला तरी अशा अभियानामुळे भविष्यातील शैक्षणिकदृष्ट्या वातावरण सुधारेल. त्यामुळे पालकांनीही या अभियानाचे कौतूक केले आहे. कॉपीसाठी प्रसिध्द असणार्‍या पाथर्डी तालुक्याचा निकाल हा सर्वात कमी 82 टक्के लागला आहे.

तालुकानिहाय निकाल
अकोले 88.42 टक्के, जामखेड 94.89 टक्के, कर्जत 87.15 टक्के, कोपरगाव 88.22 टक्के, नगर 85.93 टक्के, नेवासा 77.31 टक्के, पारनेर 86.21 टक्के, पाथर्डी 82.29 टक्के, राहाता 89.82 टक्के, राहुरी 86.55 टक्के, संगमनेर 93.70 टक्के, शेवगाव 76.63 टक्के, श्रीगोंदा 88.59 टक्के आणि श्रीरामपूर 85.51 टक्के असा एकूण 86.34 टक्के आहे.

शाखानिहाय निकाल
विज्ञान 94.60 टक्के
कला 64.73 टक्के
वाणिज्य 86.28 टक्के

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : मनपाकडून मालमत्ता करामध्ये 10 मे पर्यंत सवलत

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यांत सर्वसाधारण करावर 10 टक्के सवलत दिली...