Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रबारावीच्या निकालाची तारीख जाहीर नाही

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर नाही

पुणे (प्रतिनिधी) – सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर एचएससी बोर्डाचा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 वीचा निकाल 15 ते 20 जुलै रोजी लागणार असल्याचे सांगितल्यानंतर बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास ठेवू नये असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. निकाल ज्या दिवशी असतो त्याच्या एक दिवस आधीच बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येते. तसंच हा निकाल विद्यार्थी कुठे बघू शकतात याचीही माहीती बोर्डाकडून जाहीर करण्यात येते. यामुळे यावर्षीही बारावीच्या निकालाची तारिख दरवर्षीप्रमाणे अधिकृतपणे कळविण्यात येईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत.

- Advertisement -

बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारवीची परिक्षा जरी संपली असली तरीही लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बर्‍याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी 28 मेला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या